Product Details
समाज, गाव, शहर, देश, परदेश अशा विविध भागांत अनेक घटना रोज घडत असतात. अशा काही घटनांकडे जागरूकतेने पाहून सर्वोत्तम ठाकूर यांनी त्यावर तळमळीने विचार मांडले आहे. ते ‘रत्नागिरी ते आईनस्टाईन’ मधून वाचायला मिळतात. ठाकूर हे रत्नागिरीकर असल्याने साहजिकच आपल्या गावाबद्दल वाटणाऱ्या भावना त्यांनी सुरुवातीला व्यक्त केल्या आहेत. विविध मागण्यांसाठी लढे उभारले जातात, त्यामागचे खरे कारण त्यांनी एका लेखात दिले आहे. अशा लढ्यांमुळे समाजाचे होणारे नुकसान, कामगार नेत्यांची भूमिका यावरही प्रकाश टाकला आहे. लहान राज्याची गरज का व कशासाठी आहे, हे समजावून दिले आहे. आपल्या देशात न्यायालयाची पायरी चढल्यानंतर येणारे चांगले – वाईट अनुभव दिले आहेत. डॉक्टरी पेशातील गैरव्यवहार, मराठी माणसाची खरी ओळख करून दिली आहे. आईनस्टाईनचे जीवनातील स्थान अशा विषयांवर वैचारिक लेखन त्यांनी केले आहे. त्याचबरोबर विनोबा भावे यांच्या सहवासातील दिवस, माई म्हणजे त्यांची बहीण सुनिता ठाकूर यांचा विवाह पु. ल. देशपांडे यांच्याशी झाला त्या विषयीच्या आठवणी सांगितल्या आहेत.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
ISBN
|
9789380092997 |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
216 |
Shades / Types