Category | कादंबरी - अनुवादित |
Author | सोनिया फालेरो |
Publication | मनोविकास प्रकाशन |
सोनिया फालेरो या एक रिपोर्टर आहेत. वृत्तपत्रासाठी स्टोरी शोधत असताना त्यांची गाठ लीलाशी पडली. लीला ही एक सुंदर आणि दुसर्यावर पटकन छाप पाडेल अशी बारबाला होती; आणि तिच्यापाशी सांगण्यासारखे बरेच काही होते. मुंबईच्या डान्सबारच्या गुंतागुंतीच्या गुन्हेगारी जगताशी लीलानं सोनियाची ओळख करून दिली. हे जग होतं सुंदर, ग्लॅमरस स्त्रियांचं! अत्यंत उत्कट प्रेम, सेक्स आणि हिंसा यांनी भरलेलं असं ते जग! त्या जगातले होते कस्टमर्स आणि गुंड भाईलोक, पोलीस आणि वेश्या आणि त्यांचे दलाल! खोट्या, ढोंगी नीतिमत्तेच्या लाटेवरती आरूढ झालेला एक महत्त्वाकांक्षी राजकारणी त्या लाटेचा फायदा उचलून मुंबईतल्या डान्सबार्सचे उच्चाटन करतो त्या वेळेस लीलाचा अभिमान आणि तिची स्वतंत्र वृत्ती यांच्यासमोर एक मोठेच आव्हान उभे ठाकते. ज्या शहरात प्रत्येकाला ठाऊक असतं, की कुठे तरी कोणी तरी आपल्यापेक्षाही वाईट परिस्थितीत आयुष्य कंठत आहे, अशा त्या शहरात ती अस्तित्वासाठी झगडते - आणि जिंकण्यासाठीसुद्धा! ‘ब्युटीफुल थिंग’ ही काल्पनिक कथा नाही. ही सत्य परिस्थितीवर आधारलेली कहाणी आहे. एका रिपोर्टरने केलेला प्रवास आहे हा! मुंबईच्या गर्द काळोख्या, कायमच्या भंगलेल्या, पण तरीही सजीवपणे धडधडणार्या आत्म्याचे अत्यंत ठळकपणे आणि अगदी जवळून असे चित्रच लेखिकेने या लेखनातून रेखाटले आहे.
Publication | मनोविकास प्रकाशन |
ISBN | 978-93-81636-23-7 |
Binding | --- |
No.Of.Pages | 236 |
Shriram Krupa CHS, Agarkar Road, off, Phadke Rd, near HP Gas Agency, Dombivli East, Dombivli, Maharashtra 421201
Gadre Bandhu | Developed By Sanmisha Technologies