Product Details
‘खेळघर’सारख्या कादंबर्या संख्येने थोड्या असल्या तरी त्या वाचल्यानंतर एकविसाव्या शतकातील नवे कादंबरीकार मराठीतील कादंबरी हा वाङ्मयप्रकार किती वेगळ्या वळणावर नेऊ पाहात आहेत, हे कळून येते. ग्रामीण वा नागरी जीवनावर आघात करणारे, तसेच मानवी अस्तित्वाबद्दल पेच निर्माण करणारे विषय हे नवे कादंबरीकार प्रगल्भ जाणिवानिशी सहजगत्या हाताळताना आढळतात. हे लेखक मराठी साहित्य, विशेषत: कादंबरी, आमूलाग्र बदलू पाहात आहेत. माझ्यासारख्या जुन्या-नव्याच्या हद्दीवर वावरणार्या लेखकाला यामध्ये वाङ्मयीन परिवर्तनाचे इशारे आढळताहेत. रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या ‘खेळघर’ ह्या कादंबरीमध्ये या इशार्यांची साक्षात खूण मला दिसून येते; तिचे मी मन:पूर्वक स्वागत करतो. - मधु मंगेश कर्णिक
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-85-1 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
288 |
Shades / Types