Product Details
तानाजीच्या डोळ्यापुढं पुन्हा हिरवा डोळा आला. डोळ्याला डोळा भिडला. नजर हिरव्या डोळ्यात शिरली. खोल, डोळ्याच्या पोटात गेली. आत गोड बाळ दिसलं. द्राक्षाचं बाळ. ते तानाजीकडं बघून हसू लागलं. तानाजीला अंगभर साखर पेरल्यासारखं वाटलं. वार्याची गार झुळूक त्याला बिलगून गेली. वारा शिवारभर खेळू लागला. त्याचं काळीज उमललं. तो ओढीनं पुढं सरकला. नजर एका डोळ्यावरून दुसर्या डोळ्यावर भिरभिरू लागली. तो एक एक डोळा तपासू लागला. एखादा दुसरा डोळा घड घेऊन आला होता. बाकी वांझ. वांझ डोळं बघून तो खचू लागला. काळजात दुखू लागलं. ठणकू लागलं. गळ्याभोवतीचा टॉवेल तानाजीला फास आवळल्यासारखा वाटला. त्यानं झटकन टावेल काढला. खांद्यावर टाकला. सदर्याची बटणं काढली. आयला, सपान म्हणायचं का काय! असं कसं होईल? काय कमी पडलं बागेला? गुदस्ता फळ आलं न्हाई. पहिलं वरीस हुतं, समजून घेतलं. म्हटलं, आवंदा न्हाय, फुडंला जमेल. लोकंबी म्हणाली - पैल्या सालाला असंच होतं, फळ आलं - आलं, न्हाय आलं. फडंला बघ, पानागणिक घड दिसेल. घडाच्या वज्ज्यानं मांडव वाकंल. तुझं रान द्राक्षाच्या बागंला नामी हाय. एक नंबरनं बाग वठंल. आपुनबी मनाला लई लाऊन घेतलं न्हाई. म्हटलं, जाऊ दे, पहिला डाव भुताला! आणखी मातीत राबू, घाम गाळू, बाग आरडायला लावू. अन् हे काय मांडून ठेवलय फुडं?
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-83850-10-5 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
192 |
Shades / Types