Product Details
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चात्त्य राष्ट्रांशी संपर्क येऊन आधुनिकीकरणाचे वारे जपानमध्ये वाहू लागले. पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि साहित्याचा प्रभाव जपानी साहित्यावरही पडल्यावाचून राहिला नाही. अशा संक्रमणाच्या काळात र्युनोसुके अकुतागावा (1892-1927) यांनी आधुनिक जपानी लघुकथेचा पाया घातला. ‘जपानी लघुकथेचे जनक’ म्हणून आजही गौरवल्या जाणार्या या थोर साहित्यिकाने केवळ बारा वर्षांच्या अल्पशा साहित्यिक कारकिर्दीत शंभराहूनही अधिक कथा लिहिल्या. ऐतिहासिक कहाण्या, दंतकथा आणि आख्यायिकांवर आधारित कथानके आधुनिक शैलीत सादर करून त्याद्वारे मानवी मनाचे विविध कंगोरे अलगद उलगडून दाखवणार्या आपल्या खास शैलीमुळे अकुतागावा यांनी जपानी साहित्यविश्वात स्वत:चे आगळेवेगळे स्थान निर्माण केले. जपानच्या नामवंत लेखकाच्या लेखणीतून साकारलेल्या या कथा मराठी वाचकांनाही भावतील.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-80264-98-1 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
128 |
Shades / Types