Product Details
‘सरत्या वैशाखात सुताराची शाळा धगधगू लागे. भात्याचा करकराट आणि जंगलांवर पडणारे घणाचे घाव आवाठाला जागे करीत. आबा सुतार आणि पांडू घामाने न्हाऊन निघायचे. कोळशाची बोचकी घेऊन गावकरी सुताराच्या शाळेत येत. फाळ, जगाल, कोयत्या, कुदळींना आकार दिला जायचा. इशाड रुमण्या तासून नांगर भरले जायचे. सराई संपली की चिरकामाला सुरुवात व्हायची. दारातल्या चिंचेबुडी लाकूड-सामान येऊन पडायचं. फळ्या, रिपा, बारं चिरली जायची. कधी कधी घराची कंत्राटं मिळायची. लग्नसराई आली की गावच्या सुताराला केवढा मान! मांडवाला लागणारा सावरीचा खांब त्यानेच तासायचा. त्यासाठी मानाची धोतरजोडी आणि दक्षिणा मिळायची. सोवळ्याने जेवण व्हायचे. मान राखला जायचा...’ पण हे चित्र झपाट्यानं बदलत गेलं. शहरांची ओढ वाढली. गावाची नाळ तुटली. गावगाडा उद्ध्वस्त झाला. अलुती-बलुती मातीमोल झाली. शहर आणि मुलूख सांभाळण्याची जीवघेणी कसरत सुरू झाली. या कसरतीत गुरफटलेल्या मालवणी मुलुखातील माणसांच्या तणावग्रस्त आयुष्याच्या ह्या कथा.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
--- |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
144 |
Shades / Types