Product Details
उत्स्फूर्त कल्पनेसोबत सहज अवतरणारे यमक, अनुप्रास; क्षणार्धात मनाचा ताबा घेणारी लय आणि ताल, बालसुलभ मजेशीर शब्दरचना... बोध व उपदेशाचे ओझे झुगारून निखळ आनंदाचा स्पर्श... वसेकरांच्या बालकवितांची ही सर्व सामर्थ्यस्थळे या संग्रहात पुन्हा प्रत्ययाला येतात. 1970 च्या दशकात जन्मलेली पिढी वसेकरांच्या ‘पर्यांच्या शाळे’तील गाणी गुणगुणत वाढली. तिचा दिवस ‘घरापुढे थांबला टांगा’ने सुरू व्हायचा आणि ‘पर्यांच्या राज्यात आहे एक शाळा’ ऐकत ती झोपी जायची. ती पिढी मोठी झाली. आश्चर्य हे की, त्यांच्या मुलांवर - नव्या पिढीवर ‘पर्यांची शाळा’चे गारूड तेवढेच प्रभावी आहे. स्वत:चं, आपल्या मुलांचं आणि आता नातवंडांचं बालपण - या सर्व प्रवासात बालगीतांचा झरा वसेकरांनी झुळझुळता ठेवला हे एक आर्श्चयच. जीवनातले कडू-गोड अनुभव पचवत मोठं होताना कधीतरी बालपण सुकून, हरवून जातं. आता पुन्हा त्या बालपणात जाता येणं ही एक सिद्धीच. विशुद्ध आनंदाचा परीसस्पर्श ज्याला लाभला त्यालाच हे शक्य आहे. - एल. के. कुलकर्णी
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
--- |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
36 |
Shades / Types