Product Details
छत्रपती शिवरायांची सून ताराराणी, इंदूरची अहिल्याबाई होळकर, कित्तूर संस्थानची राणी चेन्नम्मा, झांशीची राणी लक्ष्मीबाई व अहमदनगरची चांदबीबी यांच्यात खूप साम्य आढळते. या सर्वजणी तथाकथित अबला व विधवा होत्या. त्यांच्यापैकी ताराराणी, अहिल्याबाई व चांदबीबी यांचा संघर्ष स्वकीयांशी होता, तर चेन्नम्मा व लक्ष्मीबाईंचा संघर्ष हा परकीयांशी-इंग्रजांशी होता. या दोघींना त्यांच्या पतिनिधनानंतर दत्तकाचा हक्क नाकारला होता. दोघींनी पराक्रमाची शर्थ केली. चेन्नम्मा लढाईत हरली, तर लक्ष्मीबाईंनी लढता लढता हौतात्म्य स्वीकारले. कित्तूरची चेन्नम्मा व झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर कवने, पोवाडे रचले गेले. दोघीजणी दंतकथा बनल्या. चेन्नम्माचे नाव दक्षिण भारतापुरतेच सीमित राहिले, तर राणी लक्ष्मीबाईचे नाव भारतभर दुमदुमत राहिले आहे व राहणार आहे. अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या अल्प आयुष्यात लक्ष्मीबाई लख्खकन तळपून जाणार्या विजेसारखी चमकून गेली. सर्वांचे डोळे दिपवून गेली. त्यांना शब्दरूपात वाहिलेली ही आदरांजली.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-60-8 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
92 |
Shades / Types