Product Details
आजच्या तरुण पिढीला लक्षावधी स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी किती महान त्याग केला आहे याची कल्पना नाही. आज आम्ही स्वतंत्र भारतात राहत असून सर्व तर्हेच्या मूलभूत हक्कांचा उपभोग घेत आहोत. ज्या देशातील तरुण वर्ग क्रांतिकारकांचा ॠणी असतो, तोच प्रगती करतो. क्रांतिकारकांचे मुकुटमणी शोभणार्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना समजून घेणे, हा एक आनंदाचा व स्फूर्तिदायक असा अनुभव आहे. स्वतंत्र भारताच्या आसमंतात स्वयंतेजाने तळपणारा तो एक ध्रुवतारा आहे. आजही लक्षावधी लोक नेताजींची अमोघ वाणी व वक्तृत्व यांनी भारलेले आहेत. शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी लोकांना नेताजींच्या जीवनचरित्राबद्दल अत्यंत कुतूहल आहे. नेताजी म्हणजे शूरातील शूर असे नरशार्दूल होते. ठरवलेल्या उद्दिष्टापासून क्षणभरही त्यांची चलबिचल झाली नाही. आपले ध्येय व लक्ष्य गाठण्यापासून त्यांनी कोणत्याही तडजोडी स्वीकारल्या नाहीत. स्वातंत्र्यदेवीच्या यज्ञवेदीवर आपले बलिदान देऊन ते अमर झाले.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-58-5 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
112 |
Shades / Types