Product Details
कविवर्य कुसुमाग्रज, कविवर्य नारायण सुर्वे, आणि बाबूराव बागूल म्हणजे मराठी साहित्यातील दीपस्तंभ. वर्षानुवर्षे ते तळपताहेत आणि उद्याच्या युगासाठीही ते तळपत राहणार आहेत. या तिघांच्या महाशब्दांची ओळख सर्वांनाच आहे पण महाशब्द जन्माला घालणार्या या तीनही लेखकांमध्ये दडला होता एक महामाणूसही... या तिघांच्याही गर्द सावलीत राहून मिळवलेल्या सर्वव्यापी अनुभवांची एक सुंदर माळ म्हणजे हा ग्रंथ आहे. साहित्य समजून घेत असतानाच ते जन्माला घालणारे महालेखकही समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. नव्या पिढीला हा ग्रंथ अतिशय उपयोगी पडेल कारण अतिशय सामर्थ्यशाली आणि तितक्याच हळव्या व संवेदनशील शब्दांतून या क्रांतिकारी लेखकांच्या व्यक्तिरेखा उभ्या राहिल्या आहेत. त्या वाचकांना भावतील आणि पावतीलही.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-81636-93-0 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
102 |
Shades / Types