Product Details
‘‘नऊ ऑक्टोबर 2012 रोजी तालिबानींनी माझ्या कपाळावर डाव्या बाजूला गोळी झाडली. माझ्या मैत्रिणींनाही गोळ्या मारण्यात आल्या. आमचा आवाज बंदुकीच्या गोळ्यांनी शांत करू, असं त्यांना वाटलं होतं. यात ते यशस्वी झाले नाहीत. त्यांच्या विरोधात हजारो आवाज पुढं आले. दहशतवाद्यांना वाटलं, ते मला महत्त्वाकांक्षेपासून परावृत्त करतील... उलट मी अधिक निर्भय, धैर्यवान आणि धाडसी झाले. मी तीच मलाला आहे. माझी महत्त्वाकांक्षा तीच आहे. माझ्या आशा त्याच आहेत अन् माझी स्वप्नंही तीच आहेत. पुस्तक आणि लेखणी हीच सर्वांत ताकदवान आयुधं आहेत. एक मूल, एक शिक्षक, एक लेखणी आणि एक पुस्तक सारं जग बदलू शकतं, यावर माझा ठाम विश्वास आहे. तालिबानचा मी द्वेष करीत नाही. ते माझे शत्रू नाहीत. हे मी प्रेषित महंमद, येशू ख्रिस्त आणि गौतमबुद्ध यांच्याकडून शिकले. हा वारसा मला मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आणि महंमद अली जिना यांच्याकडून लाभला. अहिंसेचं हे तत्त्वज्ञान गांधीजी, बच्चा खान व मदर तेरेसा यांच्याकडून मी शिकले. ही क्षमाशील वृत्ती मला माझ्या आईवडिलांकडून मिळाली.’’
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
--- |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
124 |
Shades / Types