Product Details
बेअर ग्रिल्स हा धाडसी मोहिमा करणार्यांमधील एक जिद्दी माणूस आहे. वीट (Wight) या बेटावर तो लहानाचा मोठा झाला. त्याच्या वडिलांनी त्याला लहानपणापासूनच नौकानयनाचे आणि गिर्यारोहणाचे धडे दिले. तरुण वयातच गिर्यारोहण आणि मार्शल आर्ट यातून त्याला स्वत:ची ओळख झाली, ध्येयसुद्धा गवसलं. धाडसी बेअर सर्वोच्च अशा हिमालयाच्या पायथ्याजवळ पोहोचला, तसेच ग्रँड मास्टरच्या कराटे प्रशिक्षण शिबिरासाठी जपानला गेला. घरी परत आल्यावर त्यानं अत्यंत कष्टप्रद असा ‘ब्रिटिश स्पेशल फोर्सेस’चा निवड अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि तो 21 ‘एस.ए.एस.’मध्ये दाखल झाला. या निवड प्रक्रियेतील काळात त्यानं शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची, चिकाटी आणि सहनशक्तीची परिसीमा गाठली होती. त्यांनतर आफ्रिकेत पॅराशूटच्या भयंकर, जीवघेण्या अपघातात त्याची पाठ तीन ठिकाणी मोडली. या अपघातातून उठून तो चालू शकेल की नाही अशी शंका वाटत असतानाच अठरा महिन्यांनंतर डॉक्टरांचे सर्व अंदाज चुकीचे ठरवत वयाच्या केवळ तेविसाव्या वर्षी एव्हरेस्ट पर्वत सर करणारा तो सर्वांत तरुण गिर्यारोहक ठरला. असामान्य अशा धाडसांची ही तर केवळ सुरुवात होती... बेअर ग्रिल्सचं कौतुक लक्षावधी लोकांनी केलं आहे आणि त्याला जागतिक प्रसिद्धीही मिळाली आहे. फारच थोडेजण जाण्याचं धाडस करतील अशा ठिकाणी जाऊनही तो जिवंत राहिला आहे. आता प्रथमच बेअर ग्रिल्स स्वत:च्या आयुष्याची कथा सांगत आहे. ही कथा ‘ऍक्शन-पॅक्ड’ म्हणजे जीवघेण्या, धाडसी घटनांची मालिका आहे. ‘मड, स्वेट अँड टीअर्स’ (चिखल, घाम आणि अश्रू) हे आत्मकथन प्रचंड आनंद देणारं. थरारक, गतिमान तसंच उमेद व उत्साह वाढवणारं असं आहे. सळसळत्या रक्ताच्या तरुणांनी आणि धाडस करू पाहणार्या वाचकांनी ही कहाणी आवर्जून वाचावी अशीच आहे. www.beargrylls.com या वेबसाईटलाही आवर्जून भेट द्यायला हवी.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-83850-36-5 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
408 |
Shades / Types