Product Details
भावगीतं, नाटक, चित्रपट, जाहिराती, जिंगल्स, शीर्षकगीतं असे बहुतेक सगळे संगीतप्रकार हाताळणारे अत्यंत यशस्वी संगीतकार म्हणजे अशोक पत्की. वादक ते संगीतकार असा जवळपास चाळीस वर्षांतला त्यांचा संगीतक्षेत्रातला प्रवास केवळ अंतस्फूर्तीचा कौल मानून त्यांनी स्वीकारला. कलाक्षेत्रातल्या अस्थिरतेची, अनिश्चिततेची जाण ठेवून अतिशय कष्टपूर्वक केलेली ही वाटचाल म्हणून अनेक वळणांनी, अनुभवांनी समृद्ध झाली आहे. अशोक पत्कींनी भावगीतांमधली अभिजात सांस्कृतिकता तर जोपासलीच पण जाहिरातींसारख्या अत्यंत व्यावसायिक, काही अंशी बाजारू कामांनाही आपल्या उपजत मेलडीचा खास रंग चढवून संगीत प्रांतात त्यांना स्थान मिळवून दिलं आहे. आपल्या वैभवशाली संगीताचा वारसा जोपासत नव्या, दमदार पिढीलाही आपल्या स्वरसाम्राज्यात सहभागी करून घेतलं. सकारात्मक दृष्टिकोन आणि माणूसधर्म उपजतच लेऊन आलेल्या स्वरचनाकाराचे हे सप्तसूर.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-81636-09-1 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
216 |
Shades / Types