Product Details
ब्रिटीशांच्या जोखडातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी यांचा मोठा वाटा आहे. तसेच क्रांतीवीरांचेही बलिदान त्यासाठी कामी आले आहे. अहिंसा आणि सत्याग्रहाप्रमाणेच ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या नाऱ्याने अनेक तरुणांना आकर्षित केले. मात्र क्रांतीविषयी फार थोडी माहीती आजच्या पिढीला आहे. मायभूमीसाठी त्यांनी केलेले बलिदान, सर्वस्वाचा त्याग, समर्पण याला वंदन करून त्यांची कथा स्मिता भागवत यांनी रंग दे बसंती चोला मधून दिली आहे. चंद्रशेखर आझाद शिवराम हरी राजगुरू, सुखदेव, भगतसिंग,जतींद्रनाथ दासम बटुकेश्वर दत्त, क्रांतिवीरांना आदरणीय असणारे भवतीभाई व्होरा आणि त्यांच्या पत्नी दुर्गाभाभी यांच्या कार्याची माहिती यात आहे.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
ISBN
|
9789380092591 |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
192 |
Shades / Types