Product Details
...नक्षलवादी अजून जंगलाच्या बाहेर आले नाहीत, हे खरं; पण जंगलाच्या बाहेर त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार नाही का? जंगलातल्या रहिवाशांमध्ये कसे पाय रोवले त्यांनी? ते मार्ग उद्या जंगलाबाहेर लागू होणारच नाहीत का? जंगलात कशी सुरुवात केली त्यांनी? ते कुठून आले? इतकी वर्षं कसे काय टिकले? की आजचे माओवादी आणि कालचे नक्षलवादी यांच्यात फरक आहे? ...कशाकशात बदल झाला आहे? त्या बदलाला भ्रष्ट होणं म्हणावं की लक्ष्याच्या दिशेनं चाललेल्या प्रवासावरचे पूर्वनियोजित टप्पे म्हणावं? ...आपण गडचिरोलीला जाणार नाही, हे खरं; पण गडचिरोली आपल्याकडे येणार नाही, ही शाश्वती कोणी दिली? मॅकबेथचे दिवस फिरले आणि मृत्यू जवळ आल्यावर शेवटी त्याला जंगल चालून आलेलं दिसलंच. आपल्यावर ही वेळ येणारच नाही? गडचिरोलीवर आली, ती कशी आली आणि ती तशी आपल्यावर येऊ नये, यासाठी कोणती उपाययोजना करायला हवी - हे समजून घेणं, त्यावर विचारमंथन करणं, आवश्यक पडलं तर त्यासाठी आपल्या जगण्यात बदल घडवून आणणं, हे गरजेचं नाही?
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-81636-97-8 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
256 |
Shades / Types