Product Details
कुंभमेळा हा भारतातील हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सोहळा आहे. देशात चार ठिकाणी भरणार्या या मेळ्यास लाखो लोकांची गर्दी होते. हा मेळा म्हणजे सर्वांच्याच दृष्टीने कुतूहलाचा विषय आहे. या मेळ्याला तशा दोन बाजू आहेत. एक धार्मिक आणि दुसरी अधार्मिक. दुर्दैवाने दुसरी बाजूच अशा मेळ्यामध्ये ठळकपणे उठून दिसते. मेळ्यात जे काही घडते त्यास धर्म, देव, श्रद्धा अशी नावे दिली जातात. ज्यांना साधू म्हणावे असे खूपच थोडे लोक मेळ्यासाठी येतात. असे तपस्वी झगमगाटापासून दूरही राहतात. त्यामुळे संपूर्ण मेळा संधिसाधूंच्या हातात जातो. आपणही अशाच प्रकारे सनातन्यांच्या आणि कर्मठांच्या दिंडीत सामील होणार काय, असेही प्रश्न निर्माण होतात. श्रद्धांच्या महापुरातून वाहून जाण्याऐवजी शांतपणे आणि तटस्थपणे या सर्वांचा वेध घेणे हेच शहाणपणाचे.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-73-8 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
116 |
Shades / Types