Product Details
ऑक्टोबर 2002 मध्ये सदानंद धुमे बालीमध्ये गेले होते. त्यावेळेस बाली ही जागा अशी होती, की तिथे असलेले सारे परदेशी लोक पळून जायच्या मार्गावर होते. आदल्याच रात्री तेथील दोन नाइटक्लबमध्ये महाशक्तिशाली स्फोट झाले होते आणि त्या स्फोटांत दोनशेपेक्षा अधिक माणसं ठार झाली होती. स्फोटाच्या दुसर्या दिवशी संध्याकाळी धुमे ज्या ‘सारी क्लब’वर स्फोट झाला होता तिथं गेले. तिथला राखेचा ढिगारा, काळ्या पडलेल्या बीअरच्या बाटल्या इत्यादी दृश्य पाहून ते आश्चर्यानं मूढ झाले. ज्या देशात अशा तर्हेचं हत्याकांड होईल असं आत्ताआत्तापर्यंत कुणालाही खरं वाटलं नसतं त्या देशाचं भवितव्य असेल तरी काय? हा प्रश्न त्यांच्या मनात उफाळून आला. जगातील सर्वांत जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया ह्या देशाचं चित्र रंगवणार्या ह्या पुस्तकाचं नाव आहे ‘माय फ्रेंड द फ फेनॅटिक.’ हा प्रवास एकत्रितपणे करणारे दोघंजण एकमेकांच्या अगदी विरुद्ध टोकाचे आहेत. त्यातले एक आहेत ते सदानंद धुमे! ते स्वत: परदेशी वार्ताहर आहेत, अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठाचे पदवीधर आहेत आणि वंशाने भारतीय असले तरी विचारांनी मात्र निरीश्वरवादी आहेत. अमेरिकन कादंबरीकार जॉन अपडाईक ह्यांचे चाहते असलेल्या धुम्यांना आर्थिक विकास ह्या विषयात रस आहे. त्यांचा सहप्रवासी आहे हॅरी नुर्दी! हॅरी कट्टर मुसलमान असून ओसामा बीन लादेन हे त्याचं दैवत आहे. हॅरी इंडोनेशियाच्या भविष्याचा प्रतिनिधी आहे का? ‘माय फ्रेंड द फेनॅटिक’ हे पुस्तक आपल्याला अस्वस्थ करते आणि त्याच वेळी परिस्थितीवर विनोदी, मार्मिक भाष्यही करते. परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला, तरीही मनाला लोभवणारा देश आहे इंडोनेशिया! त्या देशाविषयी आपल्या मनातील उत्सुकतेला खाद्य पुरवायचं काम हे पुस्तक अगदी अचूकपणे करते ह्यात काहीच संशय नाही.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-34-9 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
320 |
Shades / Types