Product Details
मराठी वंचित साहित्यात डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित ‘खाली जमीन वर आकाश’ या आत्मचरित्राने त्यातील अनुभव व अभिव्यक्ती अशा दोन्ही अंगांनी अल्पावधित व्यवच्छेद असे स्थान मिळविले आहे. सततच्या वाचक वृद्धीमुळे या आत्मचरित्राकडे मराठी अभ्यासक, समीक्षक, संपादक यांचे लक्ष जाणे स्वाभाविक म्हणावे लागेल. पुरस्कार प्राप्ती, अभ्यासक्रमात समावेश, रेडिओ वाचन, विविध भाषानुवाद, चर्चासत्रातील ऊहापोह यातून या आत्मचरित्रासंबंधी संवाद, विमर्श होणे ही काही केवळ लौकिक यशस्विता नाही. तर वंचितांच्या वेदनेचा प्रवाह मराठी साहित्यात अग्रभागी येत असल्याची ती खूणगाठ होय. डॉ. गिरीश काशिद व प्रा. विनोद कांबळे यांच्यासारखे तरुण अभ्यासक, संपादक ‘खाली जमीन वर आकाश : समीक्षा आणि संवाद’ निर्मितात तेव्हा ती नवप्रवाहाची जाणिवपूर्वक घेतलेली नोंद, दखल तर ठरतेच शिवाय मराठी समीक्षेचं क्षितिज या नव प्रतिसादांनी आक्रमू पाहत असते. हा ग्रंथ वाचणे म्हणजे एका नव्या वेदनेस केवळ समजून घेणे न ठरता ती एका निरंतर चिकित्सेच्या ऊर्जस्वला प्रयत्नांची साक्ष ठरते.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
--- |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
184 |
Shades / Types