Product Details
खगोलशास्त्राचा विकास कसा होत गेला याचा इतिहास सर्वसामान्यांना नीट माहीत नसतो. काही ठरावीक संशोधकांची नावे माहीत असतात, पण त्यांनीही नक्की कधी काय केले आणि त्यासाठी काय भोगले, सोसले हे माहीत नसते. नुसत्या संशोधनांच्या आणि संकल्पनांच्या नोंदी पाहिल्याने शोध घेणार्यांनी घेतलेले अपार कष्ट समजतच नाहीत. अनेक संशोधकांनी समाजाच्या रूढींविरुद्ध जात, कित्येकदा आपले जीव पणाला लावून, काहींनी तुरुंगवास पत्करून, तर काहींनी जगभर वणवण करून, शिवाय कित्येकांनी स्वत:च्या शारीरिक दुर्बलतेवर मात करून हे जे खगोलविज्ञानाच्या विकासाचे काम केले आहे, ती एक प्रकारे झपाटलेल्या व्यक्तींची मोठीच यशोगाथा आहे असे दिसते. महिलांच्या शिक्षणाची जेव्हा प्रथाच नव्हती, त्या काळातही समाजाशी समर्थपणे लढा देत, प्रसंगी मानहानी पत्करूनही महिलांनी खगोलविज्ञानात जे मौलिक काम केलेले आहे त्याला तोड नाही. त्यांना आजही दुर्लक्षित केले जाते, ही खरी खंत आहे. अशा या संशोधकांच्या जीवनाची, त्यांनी केलेल्या परिश्रमांची माहिती आणि त्यांनी केलेल्या कामाचे महत्त्व, तसेच त्यातून खगोलशास्त्राच्या विकसत गेलेल्या पाऊलवाटेचा आता एक महामार्ग कसा झाला आहे, हे जाणणे विस्मयकारक, मनोवेधक आहे. ही केवळ चरित्रे नाहीत, तर ध्येयवेड्या सफल खगोलप्रेमी संशोधकांच्या मार्गदर्शक कहाण्या आहेत. त्यामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर शिक्षक, पालक, सर्वसामान्य वाचक आणि खगोलप्रेमी या सर्वांसाठी कायम संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-14-1 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
160 |
Shades / Types