Product Details
असामान्य लोक तसे सामान्यच असतात, पण असामान्य गोष्टी करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. ते व्यवसायाला पूर्णपणे वाहून घेतलेले, ग्राहकाभिमुख असून प्रभावी संघटक असतात. स्वत: सतत नवीन-नवीन गोष्टी शिकत, शिकवत, एकमेकांबरोबर चर्चा करत, योग्य धोरणे ठरवून त्यांची अंमलबजावणी करून आपल्या गुणवत्तेचा दर्जा ते सतत वाढता ठेवतात. त्यांनी निवडलेला मार्ग, भलेही यशाच्या शिखराकडे जाणारा नसला तरी, निश्चयाने (जिद्दीने) मार्गक्रमणा करत ते ध्येयाप्रत पोचतात, कौतुकाची थाप वा पुरस्कार यांचा विचार न करता मूल्यवर्धित निर्मिती व अपेक्षित बदल घडवून आणणे यांना त्यांच्या लेखी अधिक महत्त्व असते. दुसर्याशी वागताना ते संवेदनशील असतात व त्यामुळे प्रभावी ठरतात. ज्या ज्या लोकांना गुणवत्तापूर्ण काम करण्याची इच्छा आहे, स्वत:चा विकास साधायचा आहे, व्यवस्थापक पदापर्यंत पोचून, नेतृत्व करण्याची इच्छा आहे, अशा सर्वांना या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल. पदवीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे लोक, व्यावसायिक, ध्येयवादी तरुण व सर्व उद्योगधंद्यातील लोक यांनाही त्याचा उपयोग होईल. यातून दृग्गोचर होणारे व्यवस्थापनाचे धडे व्यापक दृष्टिकोन देणारे असून कोणत्याही जागतिक संदर्भात ते वापरता येतील.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-35-6 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
384 |
Shades / Types