Product Details
बॉस म्हणजे निष्ठूर, निर्णय कठोर, लोखंडाचासुद्धा चावून चोथा करू शकणारा महाभाग असतो आणि कुणाचीही चूक नजरेच्या एका फटकार्यात संबंधिताच्या पदरी अपमानास्पदपणे घालायची संधी सोडत नसतो, बरोबर? ‘साफ चूक’. अनुराग अमर सचदेव ऊर्फ ऍस याचं उदाहरण पहा. अहमदाबादच्या आय.आय.एम.ए.चा माजी विद्यार्थी. एक यशस्वी इन्व्हेस्टमेंट बँकर अशी कारकीर्द चालू असताना त्याला ‘अजंता स्पेशल स्टील’ या आजारी कंपनीचा प्रमुख या पदाची जबाबदारी स्वीकारणं भाग पडतं. वास्तविक स्टील प्लान्टमधील उत्पादनक्षेत्रात त्याला काहीही पूर्वानुभव अथवा ज्ञान नाही. फक्त एक ‘सुस्वभावी माणूस’ एवढीच जमेची बाजू त्याला यशस्वी करायला पुरेशी ठरेल काय? त्याचा माजी सहाध्यायी मनू - शहाणा माणूस... आणि त्याची पत्नी अल्पना, जी त्याची निकटवर्तीय व्यवस्थापकीय विशेषज्ञ असते, यांच्या मदतीनं त्याला ही दुर्गम व दुस्तर वाटचाल करता येईल का? त्याच्या या उद्यम प्रवासाचं अवलोकन करा. अत्यंत महत्त्वाच्या मिटिंग्ज घेणं, गोंधळलेल्या कामगार वर्गाला सावरून उद्योगप्रचुर करणं आणि त्याचवेळी त्याचा टेकओव्हर टायकून बॉस याच्याशीही सुसंवाद साधणं या तीन आघाड्यांना तो कसं तोंड देतो ते पहा. दुसर्या बाजूला वयात येणार्या मुलींनाही समजून घेण्याचा प्रयत्न त्याच्या आयुष्यातील गुंतागुंत अजूनच वाढवतं. हे पुस्तक म्हणजे चांगला बॉस कसं व्हावं आणि कार्यसंस्कृती सकारात्मकपणे कशी सुधारावी, याबाबत योग्य मार्गदर्शन करतं. ‘रेडी फॉर टेक ऑफ’ या पुस्तकाच्या वाचनानं संघभावना, मनुष्यबळ व्यवस्थापन, क्वालिटी सर्कल, फाइव्ह एस., परस्परविरोधी गटांचं व्यवस्थापन, मूल्यरहित कामं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ‘नेतृत्वगुण’, अशा विविध व्यवस्थापकीय गुणांबाबत खास दृष्टिकोन प्राप्त होऊ शकतो.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-81636-98-5 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
264 |
Shades / Types