Product Details
उर्मिला’त प्रत्येक महत्वाची व्यक्तिरेखा स्पष्ट व पूर्ण स्वरूपात प्रगट झालेली दिसते. विषय सामाजिक स्वरूपाचा आहे म्हणजे तो एखाद्या मोठ्या समूहाचा आहे असे नव्हे, किंबहुना, हेच वाक्य पूर्ण फिरवून म्हणायचे तर तो विषय मानवी समूहाचा, सबंध मनुष्याजातीचा आहे. उर्मिला ही कादंबरी केवळ उर्मिला आणि विश्वास या दोन पात्रांची नाही केवळ या एका जोडप्याची नाही. ही कादंबरी एका अनिवार्य नैसर्गिक नात्याची तर आहेच, पण स्त्रीचा आदिम हक्काची आहे. स्त्रियांच्या हक्काला हळुवार स्पर्श करणारी ही कादंबरी स्त्रीच्या हक्कासंबंधी, म्हणजे व्यक्ती म्हणून पुरुषाइतकेच महत्व असेल्या व्यक्तींसंबंधी आहे. तिला तो हक्क कसा मिळतो, नव्हे तो ती कसा मिळवते हे दाखवणारी ही कादंबरी आहे. -के.ज. पुरोहित
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
113 |
Shades / Types