Product Details
‘‘गुड न्यूज!’’ ‘‘प्रेग्नन्सी कन्फर्म झाली आहे’’ असं डॉक्टरांनी सांगताच, आजच्या विचारी स्त्रीला आनंद तर होतोच. पण पुढचे नऊ महिने तिला अनेक कोडी घालत येणार असतात. आजच्या धावपळीच्या युगात शंका-समाधान करायला डॉक्टरांना वेळच नाही... अन् पेशंटलाही. पण वेळोवेळी प्रश्न तर पडतातच! ‘‘गर्भारपणी केली जाणारी सोनोग्राफी बाळासाठी सुरक्षित आहे का?’’ ‘‘मला गर्भपाताचा धोका तर नाही?’’ ‘‘डिलीव्हरी प्रीमॅच्युअर तर होणार नाही?’’ ‘‘खाण्या-पिण्यात काय काळजी घ्यायची?’’ ‘‘आईकडे जायचंय... प्लेननं जाणं सुरक्षित आहे ना?’’ ‘‘व्यायाम करायचे तर कुठले?’’ ‘‘सीझरच होतं हल्ली, नॉर्मल डिलीव्हरी करतच नाहीत डॉक्टर.’’ ...अनेक शंका-कुशंका. या दूर करायला वीस वर्ष अनुभव असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ - जे कादंबरीकारही आहेत - एका अनोख्या शैलीत थेट - या गर्भवतीबरोबर या पुस्तकात हितगुज करत आहेत. एका दृष्टीनं हे... जवळ बसून सांगितलेल्या या हिताच्या गोष्टी म्हणजेच... उपनिषद आहे. आधुनिक वैज्ञानिक मातृत्व उपनिषद!
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-80264-72-1 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
160 |
Shades / Types