Product Details
लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, तसेच मेंदूतील रक्तस्राव अशा अनेक असांसर्गिक रोगांचे भारत देश हा आगर बनला आहे. लठ्ठपणा हा स्वत: एक आजार आहेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्यामुळे उपरोक्त इतर रोग होण्याची जोखीम वाढते. इन्सुलिन हे संप्रेरक आपल्याला लठ्ठ बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. कर्बोदके असलेले खाणे वारंवार खाण्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते. या वाढलेल्या इन्सुलिनचे दुष्परिणाम म्हणजेच वर वर्णन केलेले रोग होत. सध्या लठ्ठपणा कमी करणे हा अनेकांचा धंदा बनला आहे. दुर्दैवाने हजारो रुपये खर्च करूनही लोकांच्या पदरी निराशाच येते. लठ्ठ लोक हताश होतात. या पुस्तकात सुचवलेला उपाय हा साधा-सोपा तर आहेच पण बिनखर्ची आहे. त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही वा महागडी उपकरणे किंवा विशिष्ट अशा आहाराचीही गरज नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणीही व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर हा उपाय अंगीकारू शकेल. रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी करणारा हा उपाय लठ्ठपणाबरोबरच आधी वर्णन केलेल्या जीवघेण्या रोगांच्या प्रतिबंधासाठीही उपयुक्त ठरेल. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा उपाय म्हणूनच बहुमूल्य असाच आहे. कै. डॉ. श्रीकांत जिचकारांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत शास्त्रोक्त विवेचनाद्वारे व समाजाप्रतीच्या तळमळीने हा उपाय व्याख्यानांद्वारे महाराष्ट्र व देशात पोहोचवला. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी डॉ. जिचकारांचा हा ज्ञानदीप पुस्तकरूपाने सर्व भारतीयांसमोर आणला आहे. लेखकाविषयी... एम.बी.बी.एस., एम.डी. (पी.एस.एम.), पी.जी.डी.एच.ए., पी.जी.डी.एच.आर.एम., एफ.आय.एस.सी.डी. डॉ. जगन्नाथ दीक्षित सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबादच्या पी.एस.एम. विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 23 वर्षांपेक्षाही जास्त अध्यापनाचा अनुभव आहे. ‘इंडियन सोसायटी फॉर मलेरिया ऍण्ड अदर कम्युनिकेबल डिसीजेस’ने त्यांना फेलोशिप प्रदान केली आहे. आरोग्य शिक्षणातील योगदानाबद्दल त्यांना एक राष्ट्रीय व तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. शासकीय सेवेतील अत्युत्तम कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला आहे.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
--- |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
84 |
Shades / Types