Product Details
सत्ता आणि सत्तेची लालसा भोवती फिरणारे राजकारण, त्यासाठी टाकले जाणारे डाव-प्रतिडाव, बेरजा- वजाबाक्यांची समीकरणं, जनतेचा विश्वासघात करणारे तथाकथित लोकप्रतिनिधी हे दशकांचं चित्र अरुण साधू यांच्या या कादंबरीत प्रतिबिंबित होतं. सी. एम., अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे, माणिकराव पाटील, महसूलमंत्री दत्ताजीराव जाधव, उद्योगमंत्री मारोतराव पवार, आरोग्यमंत्री भगवानराव कुणगेकर, मंत्रीपुत्र, आमदारपुत्र, सभापती आदि पात्रं कादंबरीत वाचताना आपल्या आजूबाजूला वावरत असल्याचा भास होतो. राज्याचं राजकारण बदलत जात असलं, तरी सत्तांतराचा खेळ कायम राहतो. सत्तेच्या या सारीपाटात पात्रंही बदलत जातात; पण सत्तेची लालसा आणि कुरघोडीचं राजकारणही कायम रहातं. त्यामुळेच कादंबरीची कथा आणि पात्रं कालबाह्य झालेली नाहीत.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
352 |
Shades / Types