Product Details
'Building as Learning Aid - Bala - इमारत/वास्तू : एक शैक्षणिक साधन’ ही अभिनव कल्पना सध्या भारतात रुजली असून, मोठ्या प्रमाणात लक्षवेधी ठरली आहे. व्यक्तीच्या विकासात, सामाजिक अस्तित्व व सहभागात तसेच ज्ञानार्जनाद्वारे वैश्विक नागरिक तयार करण्यात शाळांचा वाटा बहुमोल आहे. मुलांच्या वाढीच्या व व्यक्तिमत्त्व विकासाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्याला आकार देताना काळजीपूर्वक पालन-पोषण व नावीन्यपूर्ण हाताळणी यांची नक्कीच गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता, मुलांच्या जिज्ञासेला व कल्पनाशक्तीला वाव देणे व समभावाने जगणे हे शिकविण्यात शाळेच्या परिसराचा मोठा वाटा असतो. दुर्दैवाने शाळेच्या बांधकामाच्या वेळी या सर्वांचा विचार केला जात नाही. हे सर्व लक्षात घेऊन ‘बाला’ने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुलांच्या, शिक्षकांच्या व समाजाच्या शाळेसंदर्भातील गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन शाळेच्या इमारती व परिसर यासाठी अनेक प्रकारच्या संकल्पना ‘बाला’ने सुचविल्या आहेत. या संकल्पना शाळेच्या परिसरातील गरजांनुसार, मुलांची संवेदनशीलता लक्षात घेऊन शैक्षणिक व अध्यापन शास्त्रासाठी अर्थपूर्ण व उपयुक्त ठरतील. उदाहरणार्थ, सध्याच्या शाळांचे बांधकाम करताना मुलांचा विचार केला गेला नाही; परंतु ‘बाला’ खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्न उपस्थित करून त्याच्या उत्तरांतून गरजा लक्षात घेऊन एक प्रमाणबद्ध चित्रण करून नवीन संकल्पनांना जन्म देते. यातील बर्याचशा संकल्पना व पद्धती भारतात अनेक ठिकाणी यशस्वीपणे वापरल्या गेल्या असून, सरकारी व इतर संस्थांकडून सहाय्य व प्रोत्साहन मिळविण्यास समर्थ ठरल्या आहेत. अशा व्यक्ती, संस्था, शिक्षणाधिकारी सर्वांनाच या पुस्तकामुळे त्यांच्या कामात मदत होईल, तसेच नव्या कल्पनांचा विचार करून त्या सहकार्याने अमलात आणता येतील.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-80264-88-2 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
96 |
Shades / Types