Product Details
‘मराठी अस्मिता’ हा राजकारणतला एक ‘ब्रॅण्ड’ नेमका कधी बनला? खरं तर ज्ञानेश्वरांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत अनेकांच्या काळात मराठी अस्मितेचा ‘ब्रॅण्ड’ बनवण्याचा प्रयत्न झालाच होता. पण ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रा’ची स्थापना झाल्यावरही मराठी माणसाच्या वाट्याला उपेक्षितांचंच जिणं आलं. त्यामुळे एका अवचित क्षणी मराठीचा तोच तो ‘ब्रॅण्ड’ घासून-पुसून चकचकीत करून, वर त्याला ‘अस्मिते’चं अंगडं-टोपडं चढवून मार्केटमध्ये ‘रि-लॉंन्च’ करण्यात आला आणि आक्रित घडलं. ‘ब्रॅण्ड’ तर लोकप्रिय झालाच; शिवाय त्या ‘ब्रॅण्ड’पेक्षाही तो ‘ब्रॅण्ड’ नव्यानं सादर करणारा नेताच स्वत: एक ‘ब्रॅण्ड’ बनून गेला! मराठी मनावर पाच दशकं गारूड करणार्या एका अवलियाची कहाणी. वर्तमानपत्रांच्या फायलीत दडून बसलेला आणि असंख्य शिवसैनिकांच्या मनात घर करून राहिलेला हा प्रवास...
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-83-7 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
396 |
Shades / Types