Product Details
एखादी वस्तू जेव्हा जवळपास असते तेव्हा तिचे महत्त्व समजत नाही. ती नसते तेव्हाच तिचे महत्त्व ध्यानात येते. तिचे स्मरण होते. तिने व्यापून टाकलेले आयुष्यातले कण-न्-कण आणि क्षण-न्-क्षण नेणिवेच्या गाभार्यातून उफाळून वर येतात. पाण्याचेही तसेच आहे. आज थोडे फार का होईना पण ते आसपास आहे. त्याने आपले जीवन किती व्यापून टाकले आहे. ते कळतही नाही. किती अंगांनी त्याच्याशी संपर्क येतो. स्मरतही नाही. ‘तुझे-माझे, माझे-तुझे’ हे वाद सरतच नाहीत. उद्या हे नसलेच तर... असले तरी मिळाले नाही तर... त्या क्षणीच आपण आठविणार आहोत का हे जला-शिवाचे अद्वैत... आपले पाणी? जरूर वाचा. स्मरा. विचार करा. कामाला लागा.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-00-4 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
208 |
Shades / Types