Product Details
यशस्वी होण्यासाठी शक्तीची गरज असते. म्हणूनच सर्व यशस्वी व्यक्ती शक्तिवान-प्रभावी माणसं म्हणून ओळखली जातात. अस्तित्वासाठीसुद्धा शक्तीचीच गरज असते. म्हणूनच स्पर्धेच्या जगात फक्त यशस्वी माणसं स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवत असतात. जास्तीत जास्त शक्तिवान (सामर्थ्यवान) होणे ही काळाची गरज आहे. एवढंच नव्हे तर अस्तित्वासाठी, यशस्वी होण्यासाठी आणि नेहमी समाधानी राहण्यासाठीसुद्धा. कठीण काळ जास्त वेळ राहात नाही; आणि अशा कठीण काळातही कठोर वृत्तीच्या कणखर स्वभावाच्या माणसांकडे अस्तित्व टिकविण्याची शक्ती असते. हे पुस्तक स्वत:मधील ऊर्जा केंद्र (Power House) आणि त्यातून ऊर्जाशक्ती कशी मिळवावी हे सांगणारे आहे. आपले अस्तित्व, यश आणि सुख-समाधान याची निर्मिती करणारे असे हे भव्य ऊर्जा निर्मिती केंद्र कसे आहे, कसे कार्य करते हे या पुस्तकावरून समजते. इंद्रनील घोष हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर डिप्लोमाही (Post-Graduate Diploma) केलेला आहे. त्यांना इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील 27 वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. इंद्रनील घोष हे प्रशिक्षण केंद्रातही सक्रिय असतात. सकारात्मक शक्ती असणार्या व्यक्तींविषयी त्यांना विशेष आस्था आहे. परस्परपूरक आणि नावीन्यपूर्ण अशा प्रशिक्षण अभ्यासक्रमातून लोकांना ते प्रशिक्षित करत असतात. त्यांनी कार्यसंस्कृती आणि व्यवस्थापन कौशल्य या विषयांवर अनेक नियतकालिकांतून आणि वर्तमानपत्रांतून लेख लिहिले आहेत.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-63-9 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
148 |
Shades / Types