Product Details
पालकांची जीवनमूल्यं, त्यांच्या श्रद्धा आणि चालीरीती मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. मुलांची मानसिकता समजून घेऊन त्यांना सकारात्मक दृष्टिकोनाने वाढवण्यासाठी पालकांमध्ये असलेला आत्मविश्वास प्रत्येक कुटुंबात कायापालट घडवून आणू शकतो. हे पुस्तक पालकांना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले बारकावे तपासून पाहण्याची सूक्ष्मदृष्टी देईल. यात लेखिकेने सुचवलेले व्यावहारिक उपाय पालकांना त्यांच्या ‘पालकत्वा’च्या शैलीला इष्ट स्वरूप देण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतील आणि त्यामुळे मुलांचं बालपण आनंदी बनेल. शिवाय जे पालक आपल्या मुलांच्या क्षमतेविषयी साशंक आहेत त्यांनादेखील हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. पालकांसाठी मुलांचे रोजचे प्रश्न हाताळण्यास उपयुक्त अशी सुबोध मार्गदर्शिका. यात सुचवलेली तंत्र आणि सल्ले अतिशय व्यवहारी आहेत. - श्रीमती प्रेमलता गर्ग (प्रिन्सिपॉल, डीएव्ही पब्लिक स्कूल, श्रेष्ठ विहार, दिल्ली)
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-81636-49-7 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
168 |
Shades / Types