Product Details
शालेय अभ्यासात विज्ञान (सायन्स) हा एक विषय आहे. या विषयाचा तीन मुख्य शाखांचा पाचव्या इयत्तेपासून आपण अभ्यास करतो. त्या शाखा म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र. जीवशास्त्र म्हणजे सजीवांबद्दलचे शास्त्र! या सर्व सजीवांमध्ये माणूस हा मुख्य प्राणी. ह्या मानवाच्या शरीरामधील वेगवेगळ्या संस्थांचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. आपल्या शरीरात पचन संस्था, श्वसन संस्था, चेतासंस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था आणि प्रजनन संस्था अशा सहा मुख्य संस्था आहेत. प्रजनन संस्था सोडून इतर संस्था विस्ताराने शाळेत शिकवल्या जातात किंवा त्यावर खुलेपणाने चर्चाही केली जाते; पण प्रजनन संस्थेबद्दल मात्र तशी चर्चा अगर बोलणेही पुष्कळदा होत नाही. ही संस्थाही अतिशय महत्त्वाची असल्याने याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती घेणे गरजेचे आहे. प्रजनन म्हणजे आपल्याच सारख्या सजीवाला जन्म देणे. प्रजनन हा सजीवांचा मुख्य गुणधर्म आहे. निर्जीवांमध्ये प्रजनन होत नाही. या पद्धतीने प्रजनन संस्थेबद्दल वयात येणार्या मुलांना शास्त्रीय माहिती देणारे पुस्तक.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-20-2 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
24 |
Shades / Types