Product Details
गॅलिलिओने 1609 साली आकाशनिरीक्षण करण्यासाठी प्रथमच दुर्बीण वापरली. त्याला या वर्षी 400 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याची आठवण म्हणून 2009 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष’ म्हणून साजरे होत आहे. या निमित्ताने खगोलशास्त्रज्ञ सामान्य लोकांपर्यंत नेण्याचे विविध उपक्रम जगात सर्वत्र घेतले जात आहेत. ‘हे माहीत हवेच’ या मालिकेतील ही तीन पुस्तके - ‘दुर्बिणी आणि वेधशाळा’, ‘आपली सूर्यमाला’ आणि ‘आपले विश्व’ - हा या उपक्रमातीलच एक खारीचा वाटा! दुर्बीण विकत घ्यायची, तर ती कोणती घ्यावी? जगातील सर्वांत मोठी दुर्बीण कोणती? ती काम कशी करते? सूर्य-तारे का तळपतात? प्लूटोला ग्रहांच्या गटातून का काढून टाकले? आपले शेजारी तारे कोणते? विश्वाचे एकूण स्वरूप काय आणि व्यापकता किती? या विश्वाची निर्मिती कशी झाली? विश्वाचे भविष्य काय? अशा 101 गोष्टी एकेका पुस्तकात सचित्र दिल्या आहेत. थोडक्यात पण अतिशय महत्त्वाच्या, नेमक्या आणि सर्वांना ‘हे माहीत हवेच’ अशा या गोष्टी साध्यासोप्या भाषेत आणि समजायला सुलभ रीतीने मांडल्या आहेत. शिक्षक, पालक आणि सर्वच वयोगटातील विद्यार्थी वर्गासाठी ही पुस्तके संग्राह्य आणि संदर्भ म्हणूनही उपयुक्त ठरतील.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-80264-06-6 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
72 |
Shades / Types