Product Details
मुलांना फक्त काल्पनिक साहित्यच आवडते असे नाही. वास्तवाचे दर्शन घडविणार्या आणि काळजाला भिडणार्या काही गोष्टी जर कवितेतून मांडल्या तर त्याही मुलांना तितक्याच आवडतात. माझ्या कुमारवयात ‘अनुभवलेला गाव, माणसं आणि निसर्ग’ या कवितांमधून मी मुलांसमोर मांडतो. तेव्हा मुलं तल्लीन होऊन डोलताना मी पाहिलेलं आहे. जी मुलं गावाकडून आलेली आहेत, त्यांना पुन्हा एकदा गावाकडं गेल्याचा आनंद या कवितांमधून मिळतो. तर ज्यांचं बालपण शहरात गेलेलं आहे, त्यांना एका निसर्गरम्य गावाची सहल करून आल्याचा आनंद प्राप्त होतो. शिवाय म. गांधी यांनी सांगितलेल्या खेड्यात वसणार्या खर्याखुर्या भारताचे दर्शनही त्यांना घडते आणि काळ्या मातीशी त्यांचे हिरवे नाते जुळून येते.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-80264-38-7 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
28 |
Shades / Types