बाबांच्या ध्येयस्वप्नांची व्याप्ती किती मोठी आहे, याचं तळपतं उदाहरण म्हणजे बाबा आमटे यांच्या मुला-नातवंडांच्या तीन पिढ्यांनी आजवर हजारो लोकांची आयुष्यं आमूलाग्र बदलून टाकली आहेत. बाबांच्या स्वप्नांची पूर्तता होण्यामागे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अदम्य इच्छाशक्तीचाही फार मोठा वाटा आहे.