Product Details
जीवत्सु तातपादेषु नवेदारपरीग्रहे | मातृभिश्चिन्तमानानां ते हि नो दिवसा गता: || भवभूती (उत्तररामचरित) मी चाळिशीच्या घरात आलो, तेव्हा हा श्लोक जितका काव्यात्म, तितकाच वास्तव आहे, याची तीव्र जाणीव मला झाली. बालपणीच्या आणि कुमारवयातल्या अनेक आठवणी या ना त्या कारणाने माझ्या मनात जाग्या होऊ लागल्या. हुरहुर लावून जाऊ लागल्या . . . दैव, व्यक्तित्व आणि परिस्थिती या तिन्हींच्या क्रियाप्रतिक्रियांतून माणसाचे जीवन कसे घडविले हे अंधुकपणे का होईना, या आठवणींमुळे कळू लागते. मग जीवनाच्या कोड्याविषयी अधिक अचंबा वाटतो!. . जीवन म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर आपण शोधू लागतो. असंख्य विसंगतीच्या सागरातून मध्येच डोके वर करून पाहणारे एक बेत, एवढाच त्याचा अर्थ आहे, हे आपल्याला कळून चुकते!
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
817161883 |
No.Of.Pages
|
132 |
Shades / Types