Product Details
प्रसिद्धी माध्यमे कसाही अन् काहीही प्रचार करू देत, पण आजही सार्या जगाचे डोळे अमेरिकेवर असतात. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी तिथे गेलेले व अमेरिकन झालेले नागरिकही ‘आता, पूर्वीची अमेरिका राहिली नाही’ असं म्हणतात! पण बुद्धी, शिक्षण आणि मेहनत ह्यांची तयारी असणार्या प्रत्येकालाच वाटते की, स्वप्ने प्रत्यक्षात पाहायची असतील तर जावे अमेरिकेसच! ११ सप्टेंबरच्या स्फोटानंतरही आपल्याकडे अमेरिकन कॉन्सुलेटसमोर ‘व्हिसा’ मिळवण्यासाठी लांबच लांब रांग असतेच की! अशा स्वप्नांची बाग फुलवणाऱ्या देशात राहण्याचा योग आला. अमेरिकेची भव्य-दिव्यता, तेथील स्वच्छता-शिस्त-विपुलता यावर तर खूप वाचलं होतं. ह्या देशातला साधारण माणूस कसा असतो हे पाहण्यासाठी फेरफटका सुरु केला आणि विलीफ्रान्सिस दिसली. त्यामधून स्फुरलेल्या ह्या कथा… – उषा हरदास
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
109 |
Shades / Types