Product Details
श्रीकृष्णावरचे अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध असले, तरी रुक्मिणीवर रुक्मिणीस्वयंवराचा प्रसंग वगळता अन्य प्रकारे फारसे लेखन झाल्याचे आढळत नाही. रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहून आपले हरण करण्यास सांगितले, हे सर्वश्रुत असले तरी श्रीकृष्ण प्रदीर्घकाल द्वारकेबाहेर असताना द्वारकेचा राज्यकारभार खंबीरपणे हाताळणारी आणि उत्तम निर्णयक्षमता असलेली राज्यकर्ती ही रुक्मिणीची ओळख या पुस्तकातून समोर येते. अन्य सात राण्यांवर आपल्या पट्टराणीपदाचा पुरेसा वचक ठेवूनही त्यांच्याशी स्नेहाचे संबंध राखून राणीवशातील वातावरण शांत व स्थिर ठेवण्याचे कर्तव्यही रुक्मिणीने पार पाडले. रुक्मिणीच्या भावभावना व्यक्त करत श्रीकृष्णाच्या जीवनातील संपूर्ण घटनाक्रम तिच्याच शब्दांत उलगडत नेण्यात आला आहे. महाभारत, यादवांचा कुलसंहार येथपर्यंतचा संपूर्ण जीवनपट रुक्मिणी स्वत:च आत्मकथनाच्या स्वरूपात मांडते. तिचे अन्य सर्वांशी असलेले नाते उलगडता उलगडताच अखेरीस तिला आपण स्वत: लक्ष्मी देवतेचा अंश असल्याचे ज्ञान प्राप्त होते. रुक्मिणी या तेजस्वी राजकन्येचा दिव्यत्वापर्यंत झालेला हा प्रवास आहे.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788184982817 |
No.Of.Pages
|
368 |
Shades / Types