Product Details
महान तपस्वी भृगुऋषींच्या कुलात जन्म घेतलेल्या भार्गवरामाचे चरित्र, गूढ आणि अतक्र्य असेच आहे. ब्रह्मज्ञानानं परिपूर्ण असलेला भार्गवराम हा खरा क्षत्रिय होता. पृथ्वीवरच्या अन्यायी आणि अधर्मी राजांचा पराभव परशुरामाने स्वत:च्या सामथ्र्यावर केला. परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केली असे म्हणणे चुकीचे आहे. त्या काळात राजा दशरथ, राजा जनक यांसारखे अनेक राजे अस्तित्वात होते. पित्याच्या वधानं संतापलेल्या परशुरामाने सहस्रार्जुनाचा वध केला. जिंकलेला प्रदेश गुरू कश्यपांच्या हाती देताना परशुराम निर्विकार होता. गुरू कश्यपांच्या आज्ञेनं, स्वत:च्या सामथ्र्याच्या बळावर परशुरामाने अपरांत भूमी निर्माण केली. निर्माण केलेली कोकणभूमी सुजलाम् सुफलाम् केली. विविध ठिकाणी देवदेवतांची स्थापना करून धर्मप्रसार आणि धर्मरक्षणाचं महान कार्य केलं. लोककल्याण हेच परशुरामाच्या जीवनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. आज असंख्य भक्तांच्या अंत:करणात परशुरामा बद्दल आदराचं आणि भक्तीचं जे स्थान निर्माण झालं ते अपूर्वच म्हणावं लागेल.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788177669855 |
No.Of.Pages
|
268 |
Shades / Types