Product Details
संकटाशी दोन हात करण्याची प्रेरणा देणाऱ्या कथांमध्ये ही कथा जितकी जास्त प्रेरक तितकीच अधिक शोकात्म आहे.' - न्यूज ऑफ द वर्ल्ड स्कॉट ग्रहम एक कसलेला 'एसएएस' (स्पेशल एअर सर्व्हिस) सैनिक होता. उत्तर आयर्लंड आणि फॉकलंड मोहिमेबद्दल त्याला शौर्यपदक मिळालं होतं. 'आयआरए' बरोबरच्या चकमकीत त्यानं कित्येक अतिरेक्यांना कंठस्नान घातलं होतं. मायरीड फॅरेल ही 'आयआरए' साठी बॉंब पेरणारी एक लहानखुरी पण नितांत सुंदर तरुणी! या दोघांचं जीवघेणं आणि भयानक असं एक गुपित होतं. आपल्या पक्षाच्या आणि सैन्याच्या नियमांना बगल देत अनेक वर्षं ते एकमेकांवर उत्कट प्रेम करत राहिले. 'आयआरए'च्या तीन नि:शस्त्र अतिरेक्यांना रॉक ऑफ जिब्राल्टरवर गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि स्कॉट आणि मायरीडच्या छुप्या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. 'एसएएस'च्या इतिहासाला तो एक अतिशय वादग्रस्त प्रसंग ठरला. स्कॉट ग्रहमच्या असाधारण प्रेमाचं आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या तीन हत्यांचं चित्तथरारक सत्यकथन - 'शूट टू किल.'
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788184980707 |
No.Of.Pages
|
140 |
Shades / Types