Product Details
उभयचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात राहणारे प्राणी. बेडूक, भेक हे उभयचर कुणाच्या परिचयाचे नाहीत? पावसाळा सुरू झाला म्हणजे बेडकांचे निसर्गगान सुरू होते ते `डराव डराव` अशा आवाजाने! ३५ कोटी वर्षांपूर्वी त्यांचा विकास झाला तो माशांपासून. हेच ते पहिले प्राणी की, ज्यांनी जमिनीवर आपल्या जीवनाचा प्रारंभ केला; परंतु प्रजोत्पादनासाठी त्यांना पाणी आवश्यक असते. नानाविध प्रकारचे उभयचर पाहून आपण थक्क होतो. काहींना चार पाय असतात, तर काहींना दोन पाय. काही बिनपायांचे असतात. सापकिरम, न्यूट यांसारखे उभयचर अनोखेच आहेत. काही बेडूक झाडावर राहतात, तर काही उड्डाण करतात. काही शिंगधारी असतात, तर काही अत्यंत विषारी! उभयचरांमधील पिलांचे संगोपन ममतेचे मनोज्ञ दर्शन घडविते. अशा या अनोख्या जिवांची माहिती वाचकांना नक्कीच आवडेल.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788184982541 |
No.Of.Pages
|
80 |
Shades / Types