Product Details
‘यज्ञकुंड’ हा मराठी साहित्यातील श्रेष्ठ लेखक कै. वि. स. खांडेकर यांचा कुमारांसाठीचा कथासंग्रह. अतिशय सहज, अकृत्रिम शैलीतील या कथा कुमारांनाच नव्हे, तर प्रौढांनाही अंतर्मुख करतात. आपल्या देशाला पारतंत्र्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी अगणित लोकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. गांधीजी, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय, टिळक यांच्यासारख्या नेत्यांनी पेटवलेल्या यज्ञवुंâडात त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनांची, आशाआकांक्षाची आहुती दिली. त्यांनी पाहिली आदर्श समाजाची स्वप्न !... परंतु स्वतंत्र देशातली पुढची पिढी ही बांधिलकी मानते का?... केवळ व्यक्तिगत उत्कर्षासाठी व स्वार्थासाठी त्यांनी स्वत:चे वेगळे मार्ग चोखाळले तर?..... देशप्रेमाचं हे यज्ञकुंड विझेल का?... जीवनकलहाच्या आरंभी जोपासलेली मूल्यं तरी शेवटपर्यंत तशीच लखलखीत राहतात का? ‘जीवनासाठी कला’ असे मानणारे वि. स. खांडेकर आपल्या कथांतून, जीवनातील उच्च नैतिक मूल्यांचा उद्घोष करत हे प्रश्न उपस्थित करतात.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
8177662325 |
No.Of.Pages
|
48 |
Shades / Types