Product Details
पुरुषप्रधान समाजात स्त्रीचे अधिकार आणि स्त्रीमुक्ती ह्यांविषयी जे काही बोलले जाते, त्यामध्ये बांगलादेशच्या लेखिका तसलिमा नासरिन यांचा आवाज नि:संशय सर्वाधिक वरचा आणि सर्वांत अधिक खळबळ माजविणारा आहे. रूढी न मानणाया, वादविवादपटू आणि स्पष्टवक्त्या तसलिमा यांच्या ह्या पुस्तकामुळे बांगलादेशात प्रचंड वादळ उठले आणि त्यामुळे तसलिमा चर्चेच्या केंद्रबिंदू ठरल्या. त्यांच्या ह्याच धक्कादायक पुस्तकाला ‘आनंदपुरस्कार’ मिळाल्यामुळे आपल्या देशातही विविध स्तरांवर कुतूहल जागृत झाले. या विस्फोटक पुस्तकात मूळ लेखांबरोबरच, त्याच प्रकारच्या आणखी काही लेखांची भर घालण्यात आली आहे. या पुस्तकात, लेखिकेने आपल्या बालपणापासून मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी, कोणताही आडपडदा न ठेवता, लिहिल्या आहेत. ह्या आठवणी अतिशय कटू आहेत; पण त्या अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्या आहेत, ह्यात शंका नाही. या पुस्तकात, पुरुषप्रधान समाजात स्त्रीला एक भोगवस्तू समजून कसे वागविले जाते, स्त्रीच्या पायात, धर्मशास्त्र सुद्धा, कशी बेडी अडकवू पाहते; एवढेच नाही, तर ईश्वरकल्पनेतही स्त्रीच्या छळाचे इंधन, अप्रत्यक्षपणे, कसे घातले गेले आहे, व्यवहारात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पतिपत्नीसंबंधांत – थोडक्यात संपूर्ण स्त्रीजीवनात – पुरुषांची लालसा, नीचपणा, हिंस्रपणा, अधिकार गाजविण्याची कृती, लबाडी आणि प्रत्येक गोष्टीत दखल देण्याची सवय कशी दिसून येते, ह्याविषयीची आपली मते लेखिकेने अगदी धीटपणे मांडली आहेत.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
8177661817 |
No.Of.Pages
|
248 |
Shades / Types