Product Details
‘‘तुमच्या मूर्ती म्हणजे काय असतं?’’ आदिवासी ‘‘मूर्ती दगडाची, धातूची प्रतिकृती.’’ चेतन ‘‘प्रतिकृती कोणाची?’’ आदिवासी ‘‘माणसांची.’’ चेतन ‘‘माणसांच्या मदतीला येतात ते देव. आमच्या मदतीला आमची झाडं येतात म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो. झाडात जीव असतो. ती पुन:पुन्हा उगवतात. तुमचे धातूचे देव असे पुन:पुन्हा उगवतात का? किमान मातीच्या मूर्ती तरी तुम्ही करायला हव्यात. माती गर्भार राहते. मूर्ती फुटली, तर त्या मातीतून काही ना काही जन्माला येतं; झाडं, किडे, प्राणी! कारण माती मूर्तिरूपात असताना आपण श्रद्धा पेरलेली असते. धातू तर साधा ध्वनी स्वीकारू शकत नाही. त्याचा प्रतिध्वनी तो परत करून टाकतो. तो तुमच्या प्रार्थना काय स्वीकारेल?
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788184982770 |
No.Of.Pages
|
112 |
Shades / Types