Product Details
आर्क्टिकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नॅसाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नॅसाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणा-या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली एक स्फोटक मालिका. त्या उल्केबाबत अनेक वावड्या उठू लागल्या. एक वैज्ञानिक फसवणूक. जनतेची व राष्ट्राची. ३०० वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या उल्केच्या अधिकृतपणाचा मागोवा घेताना त्यात राजकारण आले, पाणबुडी आली, विमाने आली, हत्यासत्र सुरू झाले. तीन माणसे जीव वाचवण्यासाठी पळू लागली. सत्य उघडकीस आले तर? उघडकीस येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न. दा विंची कोड व एंजल्स अॅण्ड डेमन्स यानंतर डॅन ब्राऊन लेखकाची या दोन्हीवर वरताण करणारी थरारक कादंबरी. अद्ययावत तंत्रज्ञान, राजकारण आणि वैज्ञानिक मागोवा यात ढवळून गेलेली अमेरिका. हा सारा चित्तवेधी प्रकार श्री. अशोक पाध्ये यांनी मराठीत आणला आहे.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788184980790 |
No.Of.Pages
|
596 |
Shades / Types