Product Details
उर्दू गझल ऐकताना, मराठी माणसाच्या तोंडूनही ‘वाऽ क्या बात है’ अशी नकळत दाद येते. ती नेमकी कुठल्या गोष्टीला येते ? मराठी गझलला तशी दाद का येत नाही? हे ‘काहीतरी’ ज्याला ‘गझलियत’ म्हणतात, जी शब्दात सांगता येत नाही, ती मराठी गझलमधून निसटून जाते आहे का ? समकालीन उर्दू कवीच्या गझला वाचल्यावर जाणवते की, उर्दू गझल ‘बहुरुपिणी’ आहे. आधुनिक उर्दू गझल अगदी तरल कवितेच्या शैलीनेही लिहिली जाते. बव्हंशी मराठी गझल मात्र एकसुरी वाटते का ? मराठी गझलच्या संदर्भात, समकालीन उर्दू गझलांचा तुलनात्मक सौंदर्यवेध घेतला आहे सिद्धहस्त मराठी गझलकार सदानंद डबीर यांनी.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
119 |
Shades / Types