एका शहरामध्ये हरिजनवाडा जाळला गेला. त्यात दोन माणसं मृत्युमुखी पडली. त्यानंतर अशा घटना अनेक गावांमधून घडत गेल्या. शेकडो वर्षे ज्या देशात संतांची शिकवण नांदते आहे, त्या देशात, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा पंचवीस वर्षांनी या घटना का घडतात? का घडाव्यात? या मनातील व्यथेवर विचार करत करत गावोगावी हिंडून गोळा केलेल्या तपशीलातून साकार झाली ती ही समिधा.