Product Details
रणजित देसाई यांच्या असामान्य प्रतिभेचा अखेरचा आविष्कार म्हणजे ‘शे क रा’. काळी, झुपकेदार शेपूट असलेला आणि राखी रंगाचा हा खारीच्या जातीचा शेकरा, या झाडावरून त्या झाडावर झेप घेण्यासाठी प्रसिध्द आहे. घनदाट जंगलाच्या पाश्र्वभूमीवर लिहिल्या गेलेल्या या कादंबरीचा हा नायक एकाकी आहे. आपल्या खाद्यासाठी सर्व जंगलभर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत हिंडताफिरताना, सर्व ऋतूंमधली तिथल्या प्राण्यांची जिवंत राहण्यासाठी चाललेली धडपड आणि कधीकधी हतबल होऊन केलेला भीषण जीवनसंघर्षही तो बारकाईनं न्याहाळतो आहे. रणजित देसाई यांनी हे सारं चित्रण शेतकNयाच्या नजरेनं केलं असलं, तरी सगळी कादंबरी वाचून झाल्यावर वाचकाला शेतकयासारखे आपणही जीवनभर एकाकी प्रवास करतो आहोत, असं वाटल्याशिवाय राहत नाही. सुजाण वाचकाला अंतर्मुख करणारी ही साहित्यकृती आहे.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788177666472 |
No.Of.Pages
|
84 |
Shades / Types