Product Details
सही म्हणजे स्वओळख. ‘बदलत गेलेली सही’ हा कवितासंग्रह म्हणजे माणसांच्या, हरवत चाललेल्या स्वओळखीच्या शोधाचा प्रवास. एका बाजूला माणसांच्या जगण्याभोवती गरगरणारा आधुनिक काळातला, जागतिकीकरण, संगणकीकरण, युद्धखोरी आणि बाजारीकरणाचा भोवरा, त्यात हरवून गेलेली माणसाची व्यक्तीविशिष्टता, ऐहिक लोलुपतेच्या एकाच साच्यातून जगणाऱ्या माणसांचे यांत्रिकीकरण, त्याचे ताणतणाव आणि दुसऱ्या बाजूला यासकट आणि याशिवाय पुरुषी सनातनत्वाचे चटके-फटके सोसणारी, तरीही स्वतःची ओळख शोधू-जपू मागणारी स्त्री. नात्यांचे ताणतणाव पेलणारी सारं जग एका थक्क करणाऱ्या ऐहिक विकासाच्या परमोच्च बिंदूवर गतीमानतेनं पोचत असताना, जुन्याच परिघावर अडखळून उभी असलेली. अद्याप चेहराच न मिळालेली. अंजली कुलकर्णी यांनी या आधुनिक काळात वावरणाऱ्या माणसांच्या आणि विशेषकरून स्त्रीच्या दुखःची दुखरी नस नेमकेपणानं पकडली आहे. एकाच वेळी एकतानता आणि आलीप्तता, खोल विचारशीलता आणि उत्कट भावनाशीलता यांनी या कवितेच्या पैठणीवस्त्राला झळझळीत फिरता रंग बहाल केला आहे.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
122 |
Shades / Types