Product Details
पुढाकार घेतल्याशिवाय कोणालाही काहीही मिळत नाही. आयुष्यात काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर पुढाकार घ्यावाच लागतो. परंतु पुढाकार घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं हेच कित्येकांना माहीत नसतं. काही मंडळींना वाटतं की, पुढाकार म्हणजे दुसयांना रेटून पुढे जाणे. परंतु आपण जर दुसNयांना रेटून पुढे गेलो तर आपल्यालाही रेटणारा कोणीतरी, कुठेतरी, कधीतरी जन्माला येतोच; त्यामुळे असला पुढाकार यश देत नाही आणि समजा दिलंच तर ते जास्त दिवस टिकत नाही आणि समजा टिकलंच तर असल्या पुढाकारानं आयुष्य तणावग्रस्त होतं. कायमस्वरूपी यश मिळवायचं असेल, मन:शांती टिकवायची असेल, तणाव कमी करायचे असतील, कंटाळवाणं आयुष्य झटकून मजेत जगायचं असेल तर ‘पुढाकार घ्या’ हे पुस्तक वाचा. त्यासाठीही पुढाकार घ्यावा लागेल. हे पुस्तक तुम्हाला मित्रासारखं मार्गदर्शन करील. माझी खात्री आहे की, तुम्ही हे पुस्तक एखाद्या गोष्टीच्या पुस्तकासारखं वाचून मित्राला देऊन टाकणार नाही; तर स्वत:ची प्रत जपून संग्रही ठेवाल व दुसरी प्रत कुणा गरजूला भेट द्याल.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
8177667009 |
No.Of.Pages
|
280 |
Shades / Types