Product Details
तुकोबांनी अध्यात्मज्ञान गावरानभाषेत सांगितले. त्यामधून स्वत:चे आयुष्य लोकांसमोर उघड केले. गीतेच्या भाष्याऐवजी नामभक्ती शिकवली. देवाचे स्वरूप समजण्यास ही ‘संत तुकोबांची रोजनिशी’ उपयुक्त ठरेल. संत होण्यापूर्वी तुकाराम बराच काळ अनेक व्यक्तिमत्त्वांच्या रूपाने आपल्यासमवेत राहतात. त्यांच्या अनुभवांनी आपण आपल्याला तपासतो. ते आपले मित्र होतात आणि सल्ला देतात. ‘आपुलाचि संवाद’ आपणाला सांगतात. आपल्याबरोबरीने चालतात, बोलतात, विचार करतात. ते विचारप्रक्रियेने ज्ञानी होतात. त्यानंतर हळुवार पावलापावलाने आपल्यापासून दुरावतात. ‘परदेशी’ होतात.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
424 |
Shades / Types